अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण व हॉस्पीटलसमोर…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द शिवारात एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन उसाचे शेतात घेऊन जात जातीयवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली.

रवींद्र अशोक लोंढे असे जखमी तरुणाचे नाव असून मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसांनी तातडीने रांजणगाव परिसरात रवींद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना चाहूल लागताच त्यांनी रवींद्र लोंढे यांना त्या ठिकाणी दुसरीकडे नेले.

त्यानंतर आरोपींनी लोंढे यांना लाकडी दांडा आणि धारदार शस्रांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देत राहाता शहरातील पाटील हॉस्पीटलसमोर टाकून दिले.

काल शुक्रवारी सकाळी कुटूंबीय जखमी रवींद्र लोंढे यांना घेऊन फिर्याद देण्यासाठी राहाता पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच परिसरातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली.