अहमदनगर ब्रेकिंग : उधारीचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाची हत्या!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून  पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील ३७ वर्षीय तरुणाला लाथा बुक्क्यांनी छातीत, पोटात तसेच खांद्यावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली.

लोहसर खांडगाव येथील सुदाम विक्रम गीते (वय 37 वर्ष )यांनी दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत दिले नाही.

या कारणावरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांडेकर, किरण सखाराम वांडेकर, राहणार- लोहसर खांडगाव, तालुका पाथर्डी या दोघांनी मिळून सुदाम यांना लाथाबुक्क्यांनी छातीत, पोटात तसेच खांद्यावर जोरात मारहाण केल्यामुळे सुदाम हे त्या मारहाणीत मयत झाले.

मयत सुदाम याचे भाऊ आदिनाथ विक्रम गीते (वय ४२ ,धंदा -शेती) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात

गुन्हा रजिस्टर नंबर 295 /2021 भादवि कलम 302 ,34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जावळे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News