अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह..!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- शिर्डी शहरातील इनामवाडी येथे लोढा यांच्या विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.

शिर्डी शहरातील इनाम वाडीतील पेरूच्या बागे जवळील विहिरीत दत्तनगर येथील तरुण सुजित पाडाळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डी अग्निशमन दल पथकाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पाहाणी करुन पंचनामा केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राहता येथे पाठवण्यात आला असुन या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe