अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ९२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२५० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६६ आणि अँटीजेन चाचणीत १९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५६, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत १७, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०२, पारनेर ०३,

राहुरी ०२, संगमनेर १५, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१,

अकोले ०३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता १५, राहुरी ०२, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०४, राहाता ०५, शेवगाव ०३ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६८, अकोले ०२, जामखेड ०२, कर्जत ०३, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १४, नेवासा ०१,

पारनेर ०७, पाथर्डी ०१, राहाता ०७, राहुरी ०१, संगमनेर ३४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:७३९२४

उपचार सुरू असलेले रूग्ण: १२५०

मृत्यू:११४७

एकूण रूग्ण संख्या:७६३२१

 

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe