अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८८६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१२० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३४९ आणि अँटीजेन चाचणीत ८० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८९, अकोले ०८, जामखेड ०६, कर्जत १८, कोपरगाव १६, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०५, पारनेर ०८, पाथर्डी ०९, राहाता १२, राहुरी ०१, संगमनेर २५, शेवगाव १३, कॅन्टोन्मेंट १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११९, अकोले ०६, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव १९, नगर ग्रामीण १८, नेवासा १३, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता ५९, राहुरी १९, संगमनेर ३२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८० जण बाधित आढळुन आले. मनपा ३०, अकोले ०२,जामखेड ०५, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०३, पाथर्डी १९, राहाता ०६, राहुरी ०७, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०३, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२३, अकोले १०, जामखेड ०९,कर्जत १७, कोपर गाव ३१, नगर ग्रामीण १०, नेवासा १४, पारनेर २८, पाथर्डी १५, राहाता ७०, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ४६ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७८८८६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३१२०
  • मृत्यू:११८४
  • एकूण रूग्ण संख्या:८३१९०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe