अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज ९२० रुग्ण वाढले जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ५५३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३७३ आणि अँटीजेन चाचणीत ४२० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, जामखेड ०२, नगर ग्रा. २९, पारनेर २३, पाथर्डी ०८, राहता ०४, राहुरी ०३, संगमनेर ०२, श्रीगोंदा ३९ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०३, जामखेड ४५, कर्जत २२, कोपरगाव २५, नगर ग्रा.१०, नेवासा १२, पारनेर ११, पाथर्डी ०५, राहता ३७, राहुरी ४७, संगमनेर ४९, शेवगाव ६५, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४२० जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, अकोले २३, जामखेड २१, कर्जत ३२, कोपरगाव १५, नगर ग्रा. २७, नेवासा ११, पारनेर ४३, पाथर्डी १३, राहता २१, राहुरी १९, संगमनेर ७४, शेवगाव ५४, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले ३६, जामखेड ५३, कर्जत ८१, कोपरगाव २२, नगर ग्रा. ३२, नेवासा २९, पारनेर १५८, पाथर्डी ८८, राहता १८, राहुरी ११, संगमनेर ६६, शेवगाव ४८, श्रीगोंदा ८७, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:२,८५,५३४

उपचार सुरू असलेले रूग्ण:५५५३

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६१५५

एकूण रूग्ण संख्या:२,९७,२४२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe