अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ९५८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३५४ आणि अँटीजेन चाचणीत १६८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रा. ०७, पारनेर ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहुरी ०२, संगमनेर ३५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ०३, नगर ग्रा.०८, नेवासा ०९, पारनेर २५, पाथर्डी २१, राहाता १८२, राहुरी १३, संगमनेर १२, शेवगाव २५, श्रीगोंदा २५ आणि श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले १८, जामखेड ०६, कर्जत ११, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ११, नेवासा ०२, पारनेर १२, पाथर्डी २१, राहाता २५, राहुरी १३, संगमनेर ०७, शेवगाव १०, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अकोले ३३, जामखेड ४४, कर्जत २६, कोपरगाव ३९, नेवासा २३, पारनेर ५५, पाथर्डी ३८, राहता १७, राहुरी ५३, संगमनेर ३४, शेवगाव २८, श्रीगोंदा १६६, श्रीरामपूर ३० आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,६७,४५७
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२९५८
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५६६७
  • एकूण रूग्ण संख्या:२,७६,०८२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe