अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ६०८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ आणि अँटीजेन चाचणीत १६१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, अकोले १५, जामखेड १०, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ४७, पाथर्डी १८, राहुरी ०२, श्रीगोंदा ४१, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले १८, कर्जत १८, कोपरगाव १०, नगर ग्रा.४७, नेवासा १२, पारनेर ०७, पाथर्डी ०४, राहता ११, राहुरी ३०, संगमनेर ७२, शेवगाव २९, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १६१ जण बाधित आढळुन आले. अकोले १८, जामखेड ०५, कर्जत १२, कोपरगाव ०५, नगर ग्रा. १०, नेवासा १५, पारनेर २२, पाथर्डी १२, राहता ०५, राहुरी १०, संगमनेर १९, शेवगाव ०७, श्रीगोंदा १८, श्रीरामपुर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले ३६, जामखेड ४४, कर्जत ३९, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ५७, नेवासा ३५, पारनेर १००, पाथर्डी ७४, राहाता १०, राहुरी ४९, संगमनेर १०२, शेवगाव ४५, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०७, मिलिटरी हहॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,०६,१३२
उपचार सुरू असलेले रूग्ण:४६०८
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६४५७
एकूण रूग्ण संख्या:३,१७,१९७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम