अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ११४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०३ हजार ५८९ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ३९४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८९ आणि अँटीजेन चाचणीत १८९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले १३, जामखेड २१, पारनेर १२, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०१, संगमनेर १३, श्रीगोंदा ०६ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, अकोले १२, जामखेड ०४, कर्जत २०, कोपरगाव २५, नगर ग्रा.३८, नेवासा २६, पारनेर १५, पाथर्डी ०५, राहता १७, राहुरी २६, संगमनेर १०७, शेवगाव २२, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले २१, कर्जत १४, कोपरगाव ०४, नगर ग्रा. १२, नेवासा १०, पारनेर २१, पाथर्डी ४३, राहता ०१, राहुरी ०५, संगमनेर २४, शेवगाव १३, श्रीगोंदा १४ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले ९५, जामखेड ६७, कर्जत ७१, कोपरगाव २८, नगर ग्रा. ९१, नेवासा ४५, पारनेर १३७, पाथर्डी ७२, राहता ३०, राहुरी ६०, संगमनेर १६२, शेवगाव ११०, श्रीगोंदा ८४, श्रीरामपूर ४७, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,०३,५८९
उपचार सुरू असलेले रूग्ण:५३९४
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६४२६
एकूण रूग्ण संख्या:३,१५,४०९
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम