अहमदनगर जिल्ह्यात आजही कोरोना रुग्ण तीनेशे पार ! वाचा सविस्तर अपडेट्स

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-जिल्ह्यात आज ३०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार १६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३३ आणि अँटीजेन चाचणीत ३१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, कर्जत ०४, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहाता १२, संगमनेर ०२, कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६८, अकोले ०६, कर्जत ०४, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०७, पारनेर ०९, पाथर्डी ०३, राहाता ४०, राहुरी १५, संगमनेर ३८, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३१ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, जामखेड ०१, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०२, राहाता ०८, राहुरी ०२, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०७, अकोले २२, जामखेड ०६, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १३, नेवासा ०८, पारनेर ०४, पाथर्डी ११, राहाता १९, राहुरी १४, संगमनेर ५३, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १० आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७६०१६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १८३५
  • मृत्यू:११६८
  • एकूण रूग्ण संख्या:७९०१९
  • (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe