अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कंपनीने कामावरुन काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीने कंपनीच्या गाड्या व ऑफिस पेटवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे.
पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्या कंपनीचे केडगावमधील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावून काढून टाकले, त्यांच्या गाड्या रस्त्यावर अडवून, काचा फोडून चालकांना दमबाजी केली. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली.
भिमा सर्जेराव सकट (वय ३२ वर्षे रा. स्टेशन रोड, अहमदनगर) असे त्या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. तो येथील रघुजी ट्रान्सपोर्टमध्ये ट्रकचालक म्हणून नोकरीला होता.
तक्रार आल्याने त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले. या रागातून त्याने संबंधितांवर हल्ले केले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसीसी सिमेंट कंपनीच्या केडगावमधील कार्यालयाचे व्यवस्थापक मल्लीनाथ हनुमंत बोगले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम