अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- माहेरहून पैसे आणावेत, यासह इतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे याने त्याची पत्नी ज्योती ऊर्फ अनिता दिघे हिच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे घडली.
याबाबत आश्वी पोलिसात मृत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर मोहीम यांनी फिर्याद दिली आहे की, बहिण ज्योती यांचा विवाह सोमनाथ दिघे यांच्याशी १६ वर्षापुर्वी झाला होता.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/02/98446d5abc6320c7bbf253db382dd6b7a6e298909e5ab0ae0c35ceb232c13aca.jpg)
त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. सुरुवातीला दोन वर्ष दोघांचा संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे हा पत्नीला शिवीगाळ व मारहाण करु लागला.
दिवसेंदिवस त्याच्या अपेक्षा वाढू लागल्याने त्याने नवीन मोटरसायकल घेण्यासाठी ५० हजारांची मागणी केली; परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही.
दि. २७ फेब्रुवारी रोजी संजय जाधव याचा फोन आला व मला बहिनीला भेटण्यासाठी लोणी येथील दवाखान्यात बोलावले. दवाखान्यात आलो त्यावेळी बहिण मृत झालेली होती.
त्यावेळी तिच्या डोक्यात मोठी जखम दिसली. तसेच चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खूणा होत्या. त्यामुळे मेहुणा सोमनाथ दिघे याने पैशासाठी बहिनीचा खून केला आहे.
या फिर्यादीवरून दिघे याच्या विरोधात आश्वी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|