अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : जिल्ह्यातील त्या सहा जणांवर मोक्कातंर्गत कारवाई !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणा-या आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत अहमदनगर शहरातील

गुन्हेगार विजय राजू पठारे (वय 40 रा. सिद्धार्थनगर अहमदनगर ) व त्याच्या टोळीतील पाच सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई केले आहे.

विजय राजू पठारे (वय 40), अजय राजू पठारे ( वय 25), बंडू उर्फ सुरज साहेबराव साठे (वय22), अनिकेत विजू कुचेकर (वय 22), प्रशांत उर्फ मयूर राजू चावरे (वय24), अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23 सर्व रा. सिद्धार्थनगर अहमदनगर)

या संघटित गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या सहा आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईचे संकेत दिले होते.

त्या अनुषंगाने तोफखाना पोलिस ठाण्यात विजय राजू पठारे व त्याचे टोळीने संघटित गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या टोळीविरुद्ध मोक्का कायदा कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्याकडून नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावास नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी दि. 10 जुलैला मंजुरी दिली आहे. या टोळीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत.

या अनुषंगाने या कुख्यात गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांवर मोक्कांतर्गत अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!