अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-हद्दपार असुनही कोपरगाव शहरात वास्तव्यास असलेल्या राहुल शिवाजी शिदोरे (वय २१, रा. गोकूळनगरी, कोपरगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की पोलीस अधिक्षकांनी शिदोरे यास संपुर्ण अहमदनगर जिल्हा, लगतचे नाशिक जिल्ह्यातील येवला व सिन्नर तालुका,
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या महसुली हद्दीबाहेर २० महिन्यांकरीता हद्दपार करण्याचा आदेश ९ जानेवारी २०२१ रोजी बचावला होता.
असे असताना शिदोरे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची खबर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली. तीवरून सहाय्यक फौजदार ससाणे, कॉन्स्टेबल खारतोडे, शिंदे यांना सोबत घेऊन त्यास अटक केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved