अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील सर्व शाळा बंद असुन शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत.
अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या माध्यमातून शिक्षिकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकणे, असे धक्कादायक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत.

घटना क्रमांक १ : फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर
जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेच्या फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर करून ते इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आले, तसेच त्या शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील वे कृत्य केले जात होते.
घटना क्रमांक २ : शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड
दुसऱ्या घटनेत शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला होता. एका विद्यार्थ्याचा फोटो आणि मोबाइल क्रमांक गे साइटवर अपलोड करण्यात आला.
घटना क्रमांक ३ : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल
तर तिसर्या प्रकरणात एका शालेय मुलीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल करण्यात आले.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या व्यक्तींबाबत गेल्या पंधरा दिवसांत या घटना घडल्या आहेत.यातील पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर,
तपासात हे गुन्हे करणारे कुणी सराईत सायबर गुन्हेगार नव्हे तर पिडितांच्या ओळखीचेच अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













