तौक्‍ते वादळाचा अहमदनगर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा; मोठ्या प्रमाणात नुकसान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे,अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर मध्ये जोरदार सरी बरसल्या.

हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस झाला. काही काळ वाराही जोरदारपणे वाहत होता. राहुरीसह तालुक्यात देवळाली. राहुरी फॅक्टरी, वांबोरी व अन्य भागातही हलकासा पाऊस झाला.

सोसाट्याचा वाराही वाहत होता. भंडारदरा पाणलोटात सोसोट्याचा वारा वाहत आहे. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हलकासा पाऊस झाला.

नगर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वादळाने नुकसान झाले आहे. रविवारी दुपारनंतर थेट आतापर्यंत वाऱ्याचा जोर सुरूच आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

तर अनेक गावे विजेचे खांब पडल्याने आज दोन दिवस झाले अंधारात बुडाली आहेत. आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतातील उभे असणारे पीक जमिनोदस्त झाले आहे. आधीच कोरोनाने पिचलेल्या शेतकर्यांसमोर पुन्हा आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

एकीकडे करोनाचे संकट असल्याने घर खर्चाला पदरमोड नाही तर दुसरीकडे आता वादळाने घराचे नुकसान झाल्याने घरे दुरुस्त कशी करायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe