अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक : गडाख, जगताप, गायकर, काळे व कानवडे बिनविरोध !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर, मंत्री शंकरराव गडाख , माजी आमदार राहुल जगताप,माधवराव कानवडे व आमदार आशुतोष काळे या पाच ही नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नेवासा सेवा सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. मंत्री गडाख यांच्या विरोधात रत्नमाला विठ्ठलराव लंघे, कारभारी जावळे, शिवाजीराव शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड झाली. तसेच विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गायकर यांच्या विरोधातील सुरेश गडाख व दशरथ सावंत यांनी अर्ज मागे घेतल्याने गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जगताप यांचा जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला. राहुल जगताप यांना जिल्हा बँकेवर पाठविण्यावर आधीच एकमत झाले होते.

संगमनेर सोसायटी मतदारसंघातून माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या चौघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाभोवती बँकेची निवडणूक केंद्रीत झाली आहे. विखेंना एकाकी पाडण्यासाठी थोरात हे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आज (गुरुवारी) सकाळपासून नगरमध्ये मांड ठोकून बसले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe