अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक : राहुल जगताप बिनविरोध !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अहमदनगर जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजप चे वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत.

आमदार राहुल जगताप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे संचालक वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जगताप यांचा जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मार्ग सुकर झाला. राहुल जगताप यांना जिल्हा बँकेवर पाठविण्यावर आधीच एकमत झाले होते.

राजेंद्र नागवडे यांनी कालच अर्ज माघारी घेवून तसे स्पष्ट संकेत दिले होते. त्याबाबतची औपचारिकता शिल्लक होती, ती आज पूर्ण झाली जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अकोले तालुक्यातुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे राष्ट्रवादी च्या मदतीने बिनविरोध होण्याची शक्यता असून, भांगरे यांनाही इतर मागास प्रवर्गातून निवडणूक मैदानात उतरविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe