अहमदनगर जिल्हा हादरला : पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खरडगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याबाबत मृत दशरथ दळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील दशरथ मन्सीराम दळे (वय ५०) या पतीने दारुच्या नशेत पत्नी लताबाई दशरथ दळे (वय ४५) हिस लाकडी दांडक्याने ठार मारून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याबाबत मुलगा नवनाथ याने आपल्या वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली.

यात १९ रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान माझ्या आई-वडीलांचे आपसात भांडण सुरू होते. त्यांचे नेहमीचे भांडण असल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर शुक्रवारी, २० रोजी सकाळी ६ वाजता मी झोपेतून उठलो. त्यावेळी माझा लहान भाऊ संदीप याने मला फोन करून सागिंतले कि तात्याने (वडील) घराच्या जवळ असलेल्या एका झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतला. आम्ही दोघे भाऊ आईला उठवण्यासाठी झोपडीत गेलो असता आईची हालचाल होत नव्हती.

तिच्या डोक्याला मार लागून डोक्यातून व नाकातून रक्त येत होते. जवळच रक्त लागलेला लाकडी दांडा पडलेला होता. काही वेळाने घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

आई-वडिलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माझ्या वडिलांनी रात्रीच्या वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने मारहाण करून ठार मारले. पश्चातापात त्यांनी फाशी घेतल्याचे नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe