ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live Updates

Ahmednagarlive24
Updated:

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते.राज्यातील दोन हजार 353 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता.५ ) मतदान प्रक्रिया पार पडली. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या.

राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निकालाचे प्रत्येक अपडेट वेगाने तुम्हाला मिळणार आहे. गावाचा कारभारी कोण ठरणार? याची माहिती दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ईतक्या ग्रामपंचायतींसाठी मतदान

श्रीरामपूर १३ ग्रामपंचायत, राहता १२ ग्रामपंचायत, राहुरी २१ ग्रामपंचायत,नेवासे १६ ग्रामपंचायत, नगर ६ ग्रामपंचायत, पारनेर ७ ग्रामपंचायत, अकोले २२ ग्रामपंचायत, संगमनेर ६ ग्रामपंचायत, कोपरगाव १७ ग्रामपंचायत, पाथर्डी १४ ग्रामपंचायत, शेवगाव २७ ग्रामपंचायत, कर्जत ६ ग्रामपंचायत, जामखेड ३ ग्रामपंचायत, श्रीगोंदाच्या ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

लाईव्ह अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा

अकोले : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वाधिक जागा. अजित पवार गट 10 जागा, भाजप 7 जागा तर शरद पवार गटा 2 जागा. अपक्ष 2 जागेवर विजय.

कर्जत आणि जामखेड : भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 जागा, तर आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आहेत. 1 ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे. तर 1 स्थानिक.

राहता :  १२ पैकी ३ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर! ९ ठिकाणी विखे गट, तीन ठिकाणी कोल्हे गटाला सत्ता

नगर तालुका ; वडगाव गुप्ता व देऊळगाव सिद्धी येथील सत्ताधार्‍यांना सत्ता राखण्यात यश आले आले. तर अरणगाव, हिवरे झरे, मेहेकरी, हिंगणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाले.यातील चार ग्रामपंचायतीवर माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाने सत्ता मिळविली. तर अरणगाव (आ. लंके गट) व हिवरे झरे या दोन ग्रामपंचायतींवर नगर तालुका महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. वाकडी ग्रामपंचायतीत सत्तांत्तर. विखे पाटील गटाचा पराभव. भाजपचे विवेक कोल्हे गटाचा विजय.

संगमनेर : घारगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी, विखे पाटील गटाची सत्ता.

संगमनेर तालुक्यात गुंजाळवाडी ग्रामपंचायत मोठ्या फरकाने आ. बाळासाहेब थोरात यांचा सरपंच विजयी झाला आहे. कॉंग्रेस नेते उमेदवार नरेंद्र उर्फ अमोल संभाजी गुंजाळ हे सरपंच पदी विराजमान झाले आहे.

श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल हाती. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe