अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसीयू विभागात आग लागलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी नेमणुकीस असलेला महिला वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका या उपस्थित नव्हत्या.
आग लागते, धूर, पसरतोय या परिस्थितीत वेळ जात असताना संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत नसल्याने कर्तव्यात कसूर, जबाबदारी त्यांनी टाळली
त्यामुळे या चार कर्मचाऱ्यांना सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली अटक केली आहे असे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासामध्ये जी प्राप्त परिस्थिती दिसून येत आहे
त्यानुसार आयसीयू मध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णां सोबत कोणताही वैद्यकीय अधिकारी आणि इतर स्टाफ उपस्थित नव्हता,
आग लागल्यानंतर आणि धूर येत असताना स्टाफ आत मध्ये आलेला दिसून येत नाही स्वतः रुग्ण स्वतःचे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास्क आणि इतर वैद्यकीय उपकरणे स्वतःच्या हाताने काढून अक्षरशा रांगत बाहेर येत आहेत
आणि त्यामुळे कुठेतरी हा स्टाफ उपस्थित असता तर यातील अनेक रुग्ण वाचू शकले असते असा प्राथमिक निष्कर्ष निघत असल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
याअंतर्गत एक वैद्यकीय महिला अधिकारी आणि तीन इतर परीचारिका-परिचारक यांना अटक केली असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
इतर जे दोन अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांच्या बाबत तपासात सबळ पुरावे आल्यानंतर योग्य ती कारवाई पोलिस प्रशासनाकडून केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले