अहमदनगर करांचे स्वप्न होतंय पूर्ण…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर करांसाठी एक गुड न्यूज आहे कारण नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले असून, त्यातील काही खांबावर कॅप टाकण्याचेही काम सुरू झाले आहे.

उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले आहे. खूप दिवसांपासून शहरात उड्डाणपुलाचा विषय चर्चेत होता. विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत होते.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शहरातील सक्कर चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत उड्डाणपूल मंजुर झाला. त्यानंतर लष्करी भूसंपादनाचा अडथळा होता. तो ही मार्गी लागला. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. काम सुरू असतानाही वाहतुकीचा अडथळा होता.

परंतु करोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले. ते निर्बंध अजून सुरु आहे. त्यात विकासकामे वगळली.

परिणामी रहदारीचा होत असलेल्या अडथळा काही दूर झाला आणि उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले. उड्डाणपुलाचे सुमारे 85 खांब उभे राहिले आहेत. आता काही खांबावर कॅप टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचाही वेग वाढविला असल्याचे दिवाण यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe