अहमदनगर महानगरपालिकेने स्वछ सर्वेक्षण २०२१ मध्ये पटकावले थ्री स्टार !

Ahmednagarlive24
Published:

केंद्रीय शहरी कार्य मंत्रालय व स्वछ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त विभागात अहमदनगर महानगर पालिकेला थ्री स्टार मानांकन जाहीर झाले आहे. हा पुरस्कार २० नोव्हेंबरला मनपाला प्रदान करण्यात येणार आहे.

अहमदनगर महानगरपालिकेने स्वछ सर्वेक्षण २०२१ मध्ये मिळवलेल्या यशात सातत्य कायम ठेवले आहे. कचरा मुक्तीचे थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहराचे ओडीएफ प्लसप्लस मानांकन मिळवले आहे.

अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. रूपा मिश्रा यांनी अहमदनगर महानगरपालिकेस सन्मानित करण्यात येईल, असे पत्राद्वारे कळवले आहे.

मनपाने हगणदारीमुक्तीसाठी शहरातील सार्वजनिक शाैचालयांची रंगरंगोटी करून त्यावर सामाजिक संदेश लिहिले होते. पथकाने केलेल्या पाहणीनंतर मनपाला ओडीफप्लसप्लसचे मानांकन मिळाले होते.

आता कचरामुक्ती विभागात थ्रीस्टार मानांकन मिळाले आहे. २० नोव्हेंबरला विज्ञान भवनातराष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, शहरी विकास मंत्री डॉ. हरदीप पुरी, प्रधान सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते राज्यातील एकूण ९१ मनपा व नगरपालिकांचा गाैरव करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe