Ahmednagar News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा ‘आनंदोत्सव’

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर येथील आमदार लहू कानडे समर्थकांनी शहरातील यशोधन कार्यालय व येथील नगरपालिकेसमोर जल्लोष केला. यावेळी मंगळवारी (दि.४) सायंकाळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

नगर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर खासदार वाकचौरे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. निवडणूकीचा निकाल पाहण्यासाठी मंगल कार्यालयात प्रोजेक्टरवर सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच कार्यालयात गर्दी केली होती. फेरीनिहाय खा. वाकचौरे यांच्या आघाडीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते.

दुपारनंतर विजयाचे चित्र स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांनी या कार्यालयासमोर एकमेकांना लाडू भरवत खा. वाकचौरे व आ. कानडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी गुलालाची उधळण करून फटाके फोडण्यात आले.

त्यानंतर श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन महात्मा गांधी चौकात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तसेच वेस्टन चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी केली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी नगरसेवक अशोक कानडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण, कलीम कुरेशी, शिवसेनेचे संजय छल्लारे, तेजस बोरावके, सिद्धांत छल्लारे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, सचिन जगताप, हरिभाऊ बनसोडे, सुरेश पवार, रमेश आव्हाड, सरपंच सागर मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, प्रताप पटारे, अजिंक्य उंडे, दीपक कदम, रज्जाक पठाण, प्रताप देवरे, भागिनाथ शिरोळे, शब्बीर पटेल, कल्याबापू दाणे, आशिष शिंदे, रवी भांबरे, निखिल कांबळे, सम्राट माळवदे, जमीर शेख, इमरान शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe