Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हायातील उत्तर भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला गैरसोयीचे ठरते.
तथापी नगर जिल्हा विभाजित करून संगमनेर जिल्हाची निर्मिती करून अदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी न्याय्य मागणी आता राज्याचे नवे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव पारित करून पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर जिल्हा कृती समिती, सर्वपक्षीय संघटना व पत्रकार बांधवांनी केलेल्या मोठ्या आंदोलनाची स्वत:हुन दखल घेतलेल्या मंत्री विखे पाटील यांनी कृती समितीच्या शष्टिमंडळाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबई येथे भेट घडवून आणली होती.
त्यावेळी उच्चस्तरीय सचिव व अधिकारी देखिल उपस्थित होते. मात्र केवळ आश्वसनाव्यतिरिक्त कोणतीही ठोस कृती झाली नाही व संगमनेर जिल्हा मागणीचे आंदोलन हे मागे पडले. संगमनेर, साकूर, घारगाव, राजूर, अकोले अशा सर्वच आदिवासी, डोंगरी, ग्रामीण भागातील नागरिकांनी नगर जिल्हा गैरयोयीचा असल्याने संगमनेर जिल्हा मागणीचे आंदोलन सुरु केले होते.
संगमनेर व अकोल्याचे नगरचे अंतर साधारण दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरच्या आसपास येते. संगमनेर व अकोलेकरांना नाशिक जवळ पडते, परंतु नगरचे अंतर दुपटीने असल्याने संगमनेर जिल्हा घोषित करून जनतेच्या मनातील निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे.