अहमदनगर कांदा मार्केट : भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली.

काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाल 1650 ते 1700 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1650 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 900 ते 1600 रुपये तर जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. तीन-चार वक्कलांना 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe