अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यातील शिवसेनेचे झापवाडी येथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच पक्षविरोधी कामे केल्याने नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दिनकर गर्जे,
माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हाकालपट्टी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.
भाजपची जिल्हास्तरीय बैठक नगर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड,
जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसर्डा, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, नेवासे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आदी उपस्थित होते.पक्षाच्या विरोधात कोणी काम करत असेल, व त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असेल.
अशांना पक्षातून काढून टाका, असे स्पष्ट आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले. दरम्यान अहमदनगर येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नेवासे तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी स्वप्नील जरे, झापवाडीचे सरपंच तुकाराम जरे,
युवा नेते अनिल जरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. नेवासे तालुका शिवसेनेत आलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे कार्यशैलीला कंटाळून सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम