Ahmednagar Politics : मोदींच्या दौऱ्याआधीच विखे ‘टार्गेट’ ! आमदार तनपुरेंनी ‘तो’ मोठा मुद्दा समोर आणत केला मोठा घणाघात

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar Politics :- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ तारखेला शिर्डी येथे येत आहेत. नवीन दर्शन रांगेचे उदघाटन करण्याबरोबरच अनेक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. परंतु आत हा दौरा राजकीय दृष्टया टार्गेट झाला आहे.

भाजप अंतर्गतच बऱ्याच गोष्टी विखे पिता पुत्रांना ऐकाव्या लागल्या. आता राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोठा घणाघात केला आहे. मोदींचा शिर्डी दौरा यशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यातून मोठी गर्दी जमवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. हाच धागा पकडून तनपुरे म्हणाले,

शेतकरी भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे गर्दी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असणारच आहे. गर्दी जमविण्यासाठी भाजपवर गावनिहाय सभा घेण्याची वेळ आली आहे. पण ही गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घ्यावे.

गर्दी गोळा करण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर करू नये, शासनाने आपल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात एसटी बसचा वापर केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. हे लोक विसरलेले नाहीत. हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे असे म्हटले आहे.

मंत्री विखे पाटील यांनी मोठी गर्दी जमविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तशा सूचना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. कामही सुरू करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील एक लाख नागरिक सभेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शाळांना सुटी देणे गंभीर बाब
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शाळांना सुट्टी द्यायची असेल तर ही गंभीर बाब आहे. एकीकडे समूह शाळांच्या नावाखाली दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे.

यावरून सरकार शिक्षणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आले तर मग आमचा प्रखर विरोध राहील असे तनपुरे यांनी म्हटले आहे.

निळवंडे वरूनही साधला निशाणा
निळवंडे धरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाणी सोडणार आहेत. निळवंडे धरणाच्या पायाभरणीचे प्रत्यक्ष काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले होते. तत्कालीन मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे व पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम झाले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधी भाजपचे सरकार होते. तेव्हा भाजपने जेवढा निधी दिला त्यापेक्षा जास्त निधी महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात दिला.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे धरणाचे काम झाले आहे. आता निळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय घेण्याचा सरकारचा प्रयत्न केविलवाणा आहे, असेही आ. तनपुरे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe