कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अहमदनगरचे उद्योगविश्‍व सरसावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा प्रकोप झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना एम.आय.डी.सी. तील होगनास इंडिया प्रा.ली. कंपनीसह येथील अनेक कंपन्या या संकटकाळात कोरोना रुग्णांना सोयी सुविधा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

अहमदनगरच्या एम.आय.डी.सी.तील होगनास इंडिया प्रा.ली. या कंपनीच्यावतीने व नवजीवन प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने निंबळक येथील अनामप्रेम कोविड सेंटरला 30 गाद्या 30 बेड, चिचोंडी पाटील येथील शासकीय कोविड सेंटरला 30 गाद्या 30 बेड,

बुर्‍हानगर येथील कोविड सेंटरला कोविड प्रतिबंधात्मक साहित्य तसेच एम.आय.डी.सी. मधील अ‍ॅडोर वेल्डिंग लिमिटेड या सेंटरला 10 गाद्या व 10 बेड हे साहित्य औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक स्वप्नील देशमुख यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

हा लोकार्पण सोहळा होगनास इंडियाचे संचालक डॉ.शरद मगर, एच.आर.मॅनेजर सुभाष तोडकर, प्रोजेक्ट हेड शिरीष देवरे, नवजीवनचे राजेंद्र पवार, संपत रोहोकले, स्नायडर ग्रुपचे एच.आर.मॅनेजर चैतन्य खानविलकर, एच.आर. हेड श्रीकांत गाडे, ग्लोबलचे संचालक सचिन ठोसर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी होगनास इंडियाचे सुभाष तोडकर व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना स्वप्नील देशमुख म्हणाले कि, एम.आय.डी.सी. तील कंपन्यांमधील एच.आर.लीडर व सुरक्षा अधिकारी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मार्ग असोशिएशनच्या माध्यमातून कामगार,

वाहतूकदार व छोटे व्यावसायिक यांच्यासाठी अ‍ॅडोर वेल्डिंग लिमिटेड येथे ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार असून या सेंटरमध्ये चहा, नाश्ता, जेवण मोफत असणार आहे.

समाजातील अनेक दानशूर व्यक्ती एम.आय.डी.सी. तील कंपन्या अहमदनगर मधील स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, उद्योजक स्वेच्छेने पुढे येत आहेत असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नवजीवनचे राजेंद्र पवार म्हणाले कि, मार्ग असोशिएशन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, अहमदनगर सोशल फेडरेशन हि स्वयंसेवी संस्थांची संघटना तसेच केटरिंग असोशिएशन व प्रहार संघटना व लोकसहभागातून सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त गरजवंतांना जेवण, किराणा,

औषधे, जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक स्वप्नील देशमुख यांच्या समन्वयाने राबविल्याचे तसेच

आजही देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र येऊन समन्वयाने काम करून कोरोनावर नक्कीच मात करू असे पवार यांनी यावेळी सांगून सर्वांचे आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe