अहमदनगरचे युवा वन्यजीव छायाचित्रकार जगात अव्वल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- 35 फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटी, रशिया यांनी नुकताच आयोजित केलेल्या 35 अवॉर्डस या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये अहमदनगरचे ओंकार रविंद्र बेद्रे व हितेश गुलशनकुमार ओबेरॉय यांचे छायाचित्रांचे सिरिज जागतिक स्थरावरील पहिल्या 35 सर्वश्रेष्ठ वन्यजीव छायाचित्रांची सिरिज (5 छायाचित्रे) मध्ये समावेश झालेला आहे.

या स्पर्धेमध्ये 173 देशातील 1,23,418 छायाचित्रकारांनी भाग घेतला होता व एकूण 4,44,000 छायाचित्र सदर स्पर्धेसाठी दिले होते. सदर स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 देशातील 50 नामांकित छायाचित्रकारांनी केले आहे.

या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी काढलेला सुर्यास्तच्या वेळी खेळत असलेले दोन काळविटांच्या छायाचित्रांची सिरिज आणि हितेश यांनी काढलेला फॅन थ्रोअटेड लिझर्ड म्हणजेच रंगीत गळ्याचा सरड्यांचा लढा ची सिरिज जागतिक स्तरावर पहिल्या 35 छायाचित्र मध्ये सामील झालेले आहे.

वरील स्पर्धेमध्ये सर्वश्रेष्ठ 35 छायाचित्रांमध्ये भारतातील फक्त आठ छायाचित्रकारांचा समावेश असून, त्यापैकी दोन छायाचित्रकार अहमदनगरचे ओंकार आणि हितेश आहेत. ओंकार बेद्रे याच्या छायाचित्राची निवड यापूर्वी रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जून 2020 मध्ये देखील झाली होती.

ओंकार ने सलग दुसर्‍या वर्षी यश मिळविले आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार आणि हितेश ने मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचं नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा झळकावले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe