निबंध व पोस्टर स्पर्धेतून एड्सची जनजागृती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून एचआयव्ही बाबतचे गैरसमज दूर करुन याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, संतोष एडके आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीवर आकर्षक पोस्टर रंगवले.

तर निबंधातून हा आजार हद्दपार करण्यासाठी विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना हा आजार एकत्र वावरल्याने, बोलण्यातून, हस्तांदोलनातून, एकत्र सहवासातून होत नसून, याचा संसर्ग असुरक्षित संबंधातून, बाधित मातेकडून बालकाला, दूषित रक्त संक्रमणातून होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण प्रा.रंगनाथ सुंबे यांनी केले. मुख्याध्यापक चंद्रकांत भवर म्हणाले की, एड्स हा कोरोनापेक्षा महाभयंकर आजार आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक असून, एड्समुळे अनेक मृत्यूमुखी पडले आहेत. एड्सवर शंभर टक्के उपचार नसून, हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे.

यासाठी समाजात जागृती होणे अपेक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पै. नाना डोंगरे यांनी एड्स रोग टाळण्यासाठी जनजागृती व उपयायोजना हाच एकमेव पर्याय आहे. याची शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी करुन औषधोपचारही देण्यात येते. विवाहपूर्व युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe