Airtel 1 Year Validity Plan:- भारतामध्ये वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि जिओ या प्रमुख टेलिकॉम कंपनी आहेत व या तीनही कंपन्यांची एकमेकांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा असून भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर रिलायन्स जिओ नंतर एअरटेलचा ग्राहक वर्ग सर्वात मोठा आहे.
कुठलीही टेलिकॉम कंपनी असली तरी देखील ग्राहकांना रिचार्ज प्लॅन खरेदी करणे गरजेचे असते व प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कालावधीसाठीचे वेगवेगळ्या किमतीतले प्लॅन व त्या प्लॅनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधा या वेगवेगळ्या असतात.

अगदी एक महिन्याच्या व्हॅलिडीटी पासून तर एक वर्षाच्या व्हॅलिडीटीपर्यंतचे अनेक रिचार्ज प्लॅन या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांकरिता आणले गेले आहेत. त्यामध्ये एक वर्ष कालावधीसाठीचे रिचार्ज प्लान हे फायद्याचे ठरतात. या माध्यमातून परत परत रिचार्ज करण्याचे टेन्शन तर राहतच नाही.
परंतु वर्षभरचा रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे देखील जास्त मिळतात. या दृष्टिकोनातून एअरटेलचे रिचार्ज प्लान बघितले तर या टेलिफोन कंपनीच्या द्वारे ग्राहकांकरिता उत्तम असे एक वर्ष व्हॅलिडीटीचे रिचार्ज प्लान आणले गेले आहेत व ते ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याचे आहेत.
हे आहेत एअरटेलचे एक वर्ष व्हॅलिडीटी असलेले प्लान
1- 1999 रुपयांचा रिचार्ज प्लान व मिळणाऱ्या सुविधा- एअरटेलचा 1999 रुपयांचा रिचार्ज प्लान हा ग्राहकांसाठी खूप फायद्याचा असा प्लान आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला 365 दिवसांची व्हॅलिडीटी यामध्ये मिळते. यामध्ये जर प्रति महिन्याचा खर्च पकडला तर तो 167 रुपये इतका येतो.
या प्लॅनमध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग तसेच 24 जीबी डेटा म्हणजेच प्रत्येक महिन्याला दोन जीबी पर्यंत हायस्पीड डेटा प्राप्त करू शकता.
तसेच शंभर एसएमएस मोफत दिले जातात. इतकंच नाही तर हा रिचार्ज प्लान एअरटेल एक्स्ट्रीम, हॅलो ट्यून मध्ये विनामूल्य प्रवेश करण्याचे तुम्हाला संधी देतो.
2- एअरटेलचा 3599 रुपयांचा प्लान- वर्षातून एकदा 3599 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केले तर यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते व देशामध्ये कुठल्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, दोन जीबी डेटा तसेच दररोज 100 फ्री एसएमएस इत्यादी सुविधा मिळतात.महिन्यानुसार बघितले तर या रिचार्जची किंमत 300 रुपये इतकी आहे.
3- एअरटेलचा 3999 रुपयांचा प्लान- तुम्हाला वर्षभर रिचार्ज टेन्शन संपवायचे असेल व अतिरिक्त डेटा आणि मनोरंजनासारख्या सुविधा हव्या असतील तर हा प्लान तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.
या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग तसेच डेली 2.5 जीबी डेटा आणि ग्राहकांना एक बक्षीस म्हणून पाच जीबी अतिरिक्त डेटाचा बोनस मिळतो.या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सबस्क्रीप्शन सुद्धा दिले जाते.













