Ajab Gajab News : कॉफी (Coffee) पिणे सर्वाना आवडते, शरीरातील (Body) थकवा कमी करण्यासाठी सर्वजण कॉफी पीत असतात, सहसा कॉफी पिण्याची सवय आता सर्वांची गरज बनली आहे.
आजकाल, फिल्टर कॉफीचे (filtered coffee) चित्र सोशल मीडियावर (social media) दहशत निर्माण करत आहे. कॉफीच्या या छायाचित्राने (Photo) जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या चित्रात असे काय आहे, ज्याने लोकांना विचार करायला लावला आहे.
चित्रातील सत्य जाणून घेतल्यावर होश उडून जाईल
हे चित्र (Picture) आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे चित्र काळजीपूर्वक पहा. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटेल. चित्र इतकं जबरदस्त आहे की त्यातून कॉफी उचलून प्यावंसं वाटतं. हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय येते? तुम्ही विचार करत असाल की फोटोग्राफरने एक अतिशय जीवंत चित्र टिपले आहे. इथेच तुमचे डोळे फसले.
वास्तविक, हे कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र नसून ते रेखाटन आहे. जे जिवंत चित्रासारखे दिसते. चेन्नईतील एका कलाकाराने या फोटोचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
the timelapse! follow my insta @/eigteenpercentgray 🥺♥️ pic.twitter.com/Cfqgi9hX3Z
— V (@VforVendakka_) April 21, 2022
फिल्टर कॉफीच्या कपचे हे चित्र बघून तुम्ही स्केच पाहत आहात असे अजिबात वाटणार नाही. तुम्हाला वाटेल की हे कॅमेऱ्याने घेतलेले खरे कॉफीचे छायाचित्र आहे.
व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल
कलाकाराने अतिशय सुंदर रेखाटन केले आहे, जे अगदी मूळ फिल्टर कॉफीसारखे दिसते. हा फोटो पाहून जगभरातील लोक गोंधळले आहेत. या अप्रतिम स्केचला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. स्केच पाहून लोक ते तयार करणाऱ्या कलाकाराचे कौतुक करत आहेत. कलाकाराने एक टाइमलॅप व्हिडिओ देखील शेअर केला आहे.