अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- राज्यात सध्या मोफत लसीकरणचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
पवार म्हणाले की, उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.
अजित पवार यांनी म्हणाले की, मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही करण्यात आली आहे. उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले.
मोफत लसीकरणावर मी आज थेट काही भाष्य करू शकत नाही. बैठकीला अवघे 24 तास बाकी आहेत. तोपर्यंत कळ सोसा.
आज मी काही भाष्य केलं आणि उद्या कॅबिनेट चर्चेच्या अनुषंगाने आणखी वेगळा प्रस्ताव आला तर अजित पवारांची मागणी फेटाळली, अशी ब्रेकिंग न्यूज तुम्हीच कराल. त्यामुळे थोडावेळ थांबा, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान लसीची कमतरता संपूर्ण देशाला जणवते आहे. केंद्र सरकारचं लस उत्पादनावर, ऑक्सिजन प्लांटवर, रेमडेसिविर इंजेक्शन कंपन्यांवर नियंत्रण आलं आहे.
देशातल्या सर्व जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारने करायला हवं. पण भारत सरकारची भूमिका आहे ४५ पासून पुढे सगळ्यांना मोफत लसीकरण.
पण ४४ वयोगटापर्यंतच्या लोकांचं काय? असं देखील आम्ही विचार करत आहोत. उद्या तशीच वेळ पडली, तर राज्य सरकार कुठेही मागे पडणार नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|