अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा कालव्यात सुमारे 500 ते 700 इंग्लिश दारू बाटल्या आढळून आल्या असून ही दारू बनावट कि काय, कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही.
या दारूच्या बाटल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने खंडाळा येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप विघावे यांना कळविले असता
टिळकनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व दारू बॉटल ताब्यात घेऊन त्यातील दोन बॉटल लॅब टेस्टिंग साठी पाठविल्या.
दरम्यान प्रवरा कालव्यात टाकलेल्या इंग्लिश दारू बॉटल बनावट कि अन्य काही कारण, तसेच या दारू बॉटल कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम