अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचा राजीनामा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  काँग्रेसच्या खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचासुद्धा राजीनामा दिला आहे.

सुष्मिता यांच्या ट्विटर अकाऊंटवरही काँग्रेसच्या माजी नेत्या असा उल्लेख आहे. महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रालाच राजीनामा समजावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. पत्रामध्ये त्यांनी काँग्रेस नेते, सदस्य यांचे आभार मानले आहेत. सुष्मिता देव यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की,

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास कायम लक्षात राहील. मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात”.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe