कोरोणा हद्दपार करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न महत्त्वाचे- महंत रामगीरी महाराज

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  संपूर्ण देश कोरोणा महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून प्रत्येकाने कोरोना विषाणू कायमचा हद्दपार करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. यासाठी पत्रकारांनी प्रसार माध्यमातून अधिक प्रभावीपणे समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत सरला बेटाचे मठाधिपती महंत ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका यांच्या वतीने कोरोणा काळामध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्यांना कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सोमवारी (दि. १९) गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड होते. तर व्यासपीठावर राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, राहुरीचे प्रांताधिकारी दयानंद जगताप, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नायब तहसीलदार गणेश तळेकर, देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम,

माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा मार्गदर्शक विलास कुलकर्णी होते. पुढे बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, कोरोनाही ही जागतिक आपत्ती असून यामध्ये आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, अंगणवाडी सेविका यासह पत्रकारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

हा पुरस्कार सोहळा माझ्या नजरेतून आदर्श सोहळा असुन हा क्षण कायम लक्षात राहील. याप्रसंगी बोलताना डॉ. उषाताई तनपुरे म्हणाल्या की, कोरोणा काळामध्ये या योद्ध्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन समाजाची सेवा केली. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यात करोना थांबवण्यात यश मिळवले.

म्हणूनच तालुक्यात आज कोरोणाचा प्रभाव अतिषय कमी आहे. या सर्व योद्ध्यांच्या कार्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या गौरव करणे हे माझे भाग्यच असल्याचे डॉ. उषाताई तनपुरे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे तर प्रास्ताविक श्रीकांत जाधव यांनी केले.

तर अध्यक्षीय सूचना बाळासाहेब कांबळे यांनी व आभार महाराष्ट्र ग्रामीण पञकार संघाच्या राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश येवले, शरद पाचारणे,ॠषी राऊत, संदीप पाळंदे, कमलेश विधाटे, जावेद शेख, राजेंद्र आढाव लक्ष्मण पटारे, संतोष जाधव आदींनी प्रयत्न केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!