अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नरत असते. पूर्वी खेळाकडे करियर म्हणून पाहिले जात नव्हते. मात्र आता सरकार राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंना थेट नोकरीही देते. खेळाचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीनेही आहे.
क्रीडा क्षेत्रात चांगले योगदान देत खेळाडू आपल्या गावाचे, राज्याचे, देशाचे नाव उंचावतात. नगरमध्ये क्रीडा क्षेत्राला चालना देण्यास कायम कटिबध्द असून वाडिया पार्कमध्ये चांगले क्रीडा उपक्रम होत आहेत. त्यादृष्टीने येथील विविध प्रश्नांची सोडवणूक करून क्रीडा संघटनांना उत्तेजन देण्याचे काम भविष्यात होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने वयोगट 16 , 18 व 21वर्षा आतील मुला मुलींची निवड चाचणी स्पर्धा वाडिया पार्क मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेचे उदघाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्रा.एल.बी.म्हस्के,
उपाध्यक्ष रमेश मोरगावकर, शैलेश गवळी खजिनदार प्रा संजय अनभुले, प्रा. बबनराव झावरे, संजय वालेकर, प्रताप भापकर, आनंद सत्रे, सुनील गोडळकर, आबा गंधे, सचिन जावळे, अजय शिरसाठ, धनंजय थोरात, प्रमोद मयूर साठे, किशोर पठाडे, गौरव शेरकर, डॉ.विजय म्हस्के, मोहित भगत व कोचेस, खेळाडू उपस्थित होते.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी तिन्ही गटामध्ये विविध महाविदयलाय, शाळा, क्रीडा मंडळाचे १९ संघाचे जवळपास १२५ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून अहमदनगर जिल्हा संघ निवडण्यात आले असून बारामती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत खेळणार आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved