Sukanya Samriddhi Yojana 2023 : केंद्र आणि राज्य सरकार सध्या अनेक योजना राबवत आहेत. ज्याचा फायदाही सर्वसामान्य जनतेला होत आहे. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. या योजनेची सुरवात केंद्र सरकारने 2015 साली केली आहे. आज या योजनेचा लाभ लाखो लोक घेत आहेत.
तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागणार आहे. या योजनेत चांगला परतावा मिळतो तसेच या कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. फक्त 250 रुपयांपासून बचत करून तुम्ही 65 लाख रुपये मिळवू शकता.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना
2015 मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. जर तुम्हाला या योजनेत खाते चालू करायचे असेल तर ते तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत किंवा बँकेत उघडू शकता.
किती आहे व्याज दर
सुकन्या समृद्धी खाते सध्या 7.6 टक्के व्याजदर देते.
जजणून घ्या सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर
- ठेव रक्कम – 1,50,000 रुपये प्रतिवर्ष
- कार्यकाळ: 15 वर्षे
- परिपक्वता कालावधी: 21 वर्षे
- व्याज दर: 7.6%
- परिपक्वता रक्कम: रु. 65,93,071
- एकूण गुंतवणूक रक्कम: रु 22,50,000
- एकूण व्याज मिळाले: रु 43,43,071
करा 1.5 लाख रुपयांपर्यंतची बचत
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला तुमच्या करपात्र उत्पन्नातून दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करता येते. शिवाय, सुकन्या समृद्धी योजना EEE – सूट सूट श्रेणी अंतर्गत येते, ज्याचा अर्थ गुंतवणूक, व्याज आणि परतावा/परिपक्वता यावर कर सूट देण्यात येत आहे.
हे लक्षात ठेवा की मुलीचे पालक, नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. या योजनेसाठी किमान ठेव रक्कम 250 रुपये प्रतिवर्ष तर कमाल रक्कम 1,50,000 रुपये प्रति आर्थिक वर्ष इतकी आहे. जर तुम्ही आर्थिक वर्षात 250 रुपये किमान मूल्य जमा केले नाही तर तुमच्याकडून एका वर्षात 50 रुपये आकारण्यात येतात.