…अमोल मिटकरी यांना नगरमध्ये एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही – मनसे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत अहमदनगर मनसेचे जिल्हा सचिव नितीन भूतारे यांनी मिटकरी यांनी माफी मागावी अन्यथा नगर शहरात या पुढे त्यांचा एकही कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले असे सत्यपरिस्थितीला अनुसरून विधान केले होते.

हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही.सत्य परिस्तिथी त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षा मध्ये भूकंप त्यांचे अनेक नेते राज ठाकरे यांच्या वर टीका करायला लागले.

परंतू राजकारणात एखाद्या टिकेला उत्तर देताना ते वैचारीक पध्दतीने दिले पाहिजे तसे न करता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटणारे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रद्रोही असल्याचे आक्षेपार्ह ट्विट केले. यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेची मने दुखावलीआहे.

त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रातील जनतेची तसेच राज ठाकरे यांची जाहिर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळात आमदार अमोल मिटकरी यांचा एकही कार्यक्रम अहमदनगर शहरात होऊ देणार नाही. याची त्यांनी नोंद घ्यावी असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भूतारे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe