महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात ४७६ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे २०२२ पर्यंत कालव्यांची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. उत्तर नगरच्या १८२ गावातील सुमारे ६८ हजार ८०० हेक्टर शेतीला कालव्यांच्या पाण्यामुळे लाभ मिळणार आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढत मंत्री थोरात यांनी धरण पूर्ण केले. कालव्यांचे कामे काही प्रमाणात सुरू केले.

कौठे कमळेश्वर, गणेशवाडी, पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यांचे कामे पूर्ण आहेत. मात्र भाजप सरकारच्या २०१४-१९ कालखंडात कालव्यांची कामे ठप्प झाली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच कालव्यांच्या कामांना गती आली. अकोले तालुक्यातील ० ते २८ किमी. कालव्यांच्या कामाला सुरुवात झाली.

कोरोनामुळे कामाची गती मंदावली. मंत्री थोरात यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन कामाला गती दिली. अकोलेतील शेतकऱ्यांच्या अडचणी मार्गी लावल्या. २०२३ पर्यंत या भागाला पाणी देण्याचे मंत्री थोरातांचे उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांना या बाबत सूचना देण्यात आल्या असून याचा रोजचा आढावा घेतला जात आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करुन या अर्थसंकल्पात धरणाच्या इतिहासात प्रथमच ४७६ कोटींची भरीव मदत केली. यासाठी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनाही यासाठी साकडे घालण्यात आले. कोरोना संकटातही निळवंडेच्या कालव्याने भरीव निधी मिळाला.

३१ मार्चपर्यंत १०० कोटी तर पुढील आर्थिक वर्षात ३७६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. गरज भासल्यास हिवाळी अधिवेशनात निधी मागता येणार आहे. यामुळे २०२२ पर्यंत कालव्यांची कामे मार्गी लागणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे १८२ गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe