अरणगावात आठ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्याने दरदिवशी हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे कोरोनाचे वादळ जिल्ह्यावर हाहाकार माजवत आहे.

यामुळे प्रशासन देखील कठोर निर्णय घेऊ लागले आहे. नगर तालुक्यातील अरणगाव येथ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने प्रशासनाच्यावतीने अरणगाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे.

येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेल्याने तालुका प्रशासनाने गावात ८ दिवसकॅन्टेन्टमेंट झोन जाहीर केला आहे.

अरणगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी शनिवारी आदेश काढून गावातील बहुतांश भाग ८ एप्रिलपर्यंत कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर केला. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले.

नगर शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच बंद झाल्याने तालुक्यातील शेकडो रुग्ण सध्या शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.

तालुक्यात १ मार्च ते २५ मार्चपर्यंत ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अरणगावमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe