आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विनयभंगाची एक धक्कादायक घटना घडली आहे. लुडो खेळण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की स्टेशन रोड परिसरातील एका फळं विक्री करणाऱ्या महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने सदर महिला तिच्या घरात झोपलेली असताना तिची लहान मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला लूडो खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावले.

आणि तिचे कपडे काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या वेळी ती मुलगी मोठ्याने ओरडली.त्या आवाजाने तीची आई उठून तिकडे धावली आणि तिने मोठ्याने ओरडून मुलीस तेथून घेऊन आली.

मुलीस काय झाले असे विचारताच तिने सर्व प्रकार सांगितला. तसेच या पूर्वीही त्याने असा प्रकार केल्याचे सांगितलें. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली असून अधिक तपास. कोतवाली पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe