अज्ञात वाहनाने घेतला परत एका बिबट्याचा जीव !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेवगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारा एक बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट,

डोळासणे, माहुली घाट आदी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे अनेकदा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांची धडक बसून आजवर अनेक बिबट्यांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारे दोन वर्षाचा एक नर जातीचा बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली.

वेगवान वाहनाच्या या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. सदरची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक सी.डी.कासार,अरुण यादव हे घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी मृत बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी त्या मृत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News