अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- सध्या राज्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मधल्या काळात हे प्रमाण बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत ती दरदिवशी १० नवीन रुग्ण वाढत आहेत.
आज रोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून, प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी२०२१ अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.

त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. परंतू छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही.
त्यामुळे सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता छापील विक्री किमतीनुसारच आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या दिलेल्या
सुचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना कमी किंमतीत दिल्याचे आढळून आले.
तथापि याबबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी याबाबत दखल घेवून
सदर रेमडेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात सदर रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची नुकतीच बैठक झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|