आनंदवार्ता: मागील वर्षीचा ‘त्या’ शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-जिल्हयातील सन २०१९ – २० चा खरीप व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

चुकीचे खाते नंबर, सेतुकेंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे नावात बदल तसेच इतर तांत्रिक बाबीमुळे पिकविमा मंजूर होवुनही शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे परत गेले आहेत.

त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी संबंधीत तालुक्यातील ए.डी.सी.सी बँकेच्या टि.डी.ओ ऑफीसमध्ये (तालुका विकास अधिकारी) याद्या उपलब्ध असुन त्यामध्ये जर नाव असेल,

तर त्या शेतकऱ्यांनी फोटो सहीत बँक पासबुक,त्यावर संपुर्ण खाते नंबर ,आय एफ एस सी कोड,बैंच कोड सहीत पहिल्या पानाचा फोटो पारनेर बाजार समिती कार्यालयात जमा करावे.

इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत तालुक्याच्या ए.डी.सी.सी बँकेच्या टि.डी.ओ ऑफीसमध्ये (तालुका विकास अधिकारी) जमा करावेत असे आवाहन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचीत संचालक उदय शेळके व गायकवाड यांनी केले आहे.

तरी जिल्हयातील पिकविम्यापासुन वंचित सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe