अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- रस्त्यावरच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण चालू होते. व हे सुरु असलेले भांडण पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना अकोले नाक परिसरात घडली आहे.
दरम्यान या प्रकरणी गोकुळ दिलीप गडगे (रा. मालदाड रस्ता, दिवेकर गॅसजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये घनश्याम बर्डे, सद्दाम (पूर्ण नाव माहीत नाही), राहुल सोनवणे (सर्व रा. भराडवस्ती, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अकोले नाका परिसरात बर्डे, सद्दाम व सोनवणे या तिघांमध्ये भांडण सुरू होते.
ते पाहण्यासाठी गडगे व त्यांचा मित्र असे दोघे जण थांबले होते. भांडण पाहण्यासाठी थांबल्याचा रा. आल्याने तिघांनी त्यांना मारहाण सुरू केली.
मोटारसायकलमधील पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने बर्डे याने आग लावून त्यांची मोटारसायकल पेटवून दिली.
या घटनेनंतर गडगे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक संदीप बोटे अधिक तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम