अनिल राठोड हे गरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नेते : आमदार लंके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-  शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड हे गरिबांच्या प्रश्नासाठी धावून जाणारे नेते होते. त्यांनी २५ वर्षात समाजसेवेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला होता, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती तैलचित्राचे अनावरण आमदार लंके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापाैर रोहिणी शेंडगे, माजी आमदार दीपक पायगगुडे, विक्रम राठोड, संभाजी दहातोंडे, दत्ता जाधव,

बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, सतीश मैड, मदन आढाव, गिरीष जाधव आदी उपस्थित होते. लंके म्हणाले, पुण्यस्मरणानिमित्त आमदार निलेश लंके व विक्रम राठोड यांच्यातर्फे ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेऊन डाॅक्टर व्हायचे आहे, अशा ७० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येईल.

राजकीय जीवनात नेहमीच राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले, असे त्यांनी सांगितले. विक्रम राठोड म्हणाले, स्व. अनिल राठोड यांना अभिप्रेत असलेले पुढील कालाावधीतही सुरू ठेऊन गरिबांच्या शिक्षणासाठी शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहील. २४ तास उपलब्ध असलेले आमदार अशी त्यांची ख्याती होती.

ही परंपरा शिवसेना पुढेही सुरू ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिवालयात दिवसभरात संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, गिरीष कुलकर्णी, सुवेंद्र गांधी, किरण काळे, राजेंद्र गांधी, माजी महापाैर भगवान फुलसाैदर, सुरेखा कदम, संभाजी कदम, अनिल बोरूडे, गणेश कवडे, स्मिता अष्टेकर आदींनी भेट देऊन अभिवादन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe