अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- ‘खचून जाऊ नका, अपमान सहन करण्याची ताकद ठेवा. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा आदर्श ठेवून बदलीला न घाबरता काम करा,’ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना दिला.
लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी अण्णा त्यांच्याशी बोलत होते. काल आमदार लंके यांनी अण्णांची भेट घेतली होती,
त्यानंतर आज सकाळीच देवरे यांनीही अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली. देवरे यांना अण्णा म्हणाले, या प्रकरणाची माहिती मिळाल्यापासून नेमकं काय घडले आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, संपर्क होत नव्हता.
खचून जाऊ नका, धीराने परिस्थितीला समोरे जा. अधिकारी म्हणून लोकसेवेचे काम करताना अपमान पचवण्याची ताकद ठेवली पाहिजे. वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे पाहा. त्यांच्या आजपर्यंत किती वेळा बदल्या झाल्या? तरीही ते डगमगत नाहीत. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका.
असा सल्लाही हजारे यांनी दिला. जनतेचे काम करताना आरोप होत असतात. मलाही यासाठी तुरुंगात जावे लागले होते. मधल्या काळात मी खूपच अस्वस्थ असल्याने भेटू शकले नसल्याचे देवरे यांना हजारे यांना सांगितले. अण्णांना भेटून जाताना नवी ऊर्जा मिळते.
हजारे यांची भेट आणि सल्ला मोलाचा असल्याचे सांगून त्यांनी मधल्या काळातील घडामोडी आणि आरोपासंबंधी हजारे यांच्याशी चर्चाही केली. हा विषय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील आहे. मी यात बोलू शकत नाही, असं म्हणून हजारे यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम