अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेवा देणारे चालक व वाहकाचा माळीवाडा बस स्थानक येथे सत्कार करण्यात आला.
तर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते बसपुढे नारळ वाढविण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार मुकादम वाहतूकदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पाडळे, वंचित बहुजन आघाडीचे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार, ए.एम.टी व्यवस्थापक रावसाहेब काकडे, सुभाष पठाडे,
सौरभ झिंजे, अनिल गायकवाड, सुनील दिवेकर, भूषण कांबळे, संदीप गायकवाड, जीवन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागर चाबुकस्वार म्हणाले की, भिंगार येथील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला व नोकरदार वर्गाच्या सोयीसाठी शहरात येण्याजाण्याची सोय होण्याकरिता
अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन ही बस सेवा कार्यान्वीत करुन घेण्यात आली.
या बस सेवेला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळून, सोय झाली आहे. तसेच विद्यार्थी महिला व नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. या सेवाचा वर्षपुर्ती म्हणून शहर बस सेवेचे आभार मानण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|